‘या’ कंपनीने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त 5जी फोन; जाणून घ्या दमदार फीचर्स आणि किंमत

मुंबई :

एकेकाळी मोबाइल क्षेत्रात मोठी क्रांती करणार्‍या मोटरोला कंपनीने मधल्या काळात शांतपणे आपले काम चालू ठेवले होते. आता ही कंपनी पुन्हा फॉर्ममध्ये आली आहे. मोटरोलाने (Motorola) ५जी च्या बाजारात खळबळ उडवून दिली आहे.

मोटरोलाने सर्वात स्वस्त 5जी फोन भारतात लाँच केला आहे. विशेष बाब म्हणजे आता हा फोन बड्या कंपन्यांच्या आणि लोकप्रिय असणार्‍या वनप्लस नॉर्डला टक्कर देणार आहे. फ्लिपकार्टवर या इये कॉमर्स साईटवर Moto G 5G हा फोन ७ डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता.

असे आहेत फीचर्स :-

–    क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर

–    6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले

–    अँड्रॉईड १० वर चालतो. 

–    128 जीबी इनबिल्ट स्टोरेज

–    डस्ट प्रोटेक्शन IP52

–   5000mAh ची बॅटरी

–    फोनचे वजन 212 ग्रॅम

–    वॉल्कैनिक ग्रे आणि फ्रॉस्टेड सिल्वर रंगामध्ये उपलब्ध

–    48 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल वाइड-अँगल व तिसरा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

जाणून घ्या किमतीविषयी :-

Moto G 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या लाँच करताच डिस्काऊंट देण्यात येत असून हा फोन चार हजार रुपयांनी स्वस्त विकला जाणार आहे. याचबरोबर एसबीआय किंवा अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरल्यास त्यावर 5 टक्के कॅशबॅक तर एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here