मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ‘ही’ 9 कागदपत्रे पुरावा म्हणून धरली जाणार ग्राह्य; वाचा संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट

पुणे :

आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागे झाले आहेत. आता विधानपरिषद निवडणुकीच्या तोफा थंडावल्या आहेत. विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त अन्य पर्यायांचा देखील वापर करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र व्यतीरिक्त इतर 9 कागदपत्रे अशी आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही मतदान करू शकता. निवडणूक आयोगाने दिलेल्या महितीनुसार मतदान करण्यासाठी ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.  

हे आहेत पर्याय :-

1) आधार कार्ड

2) वाहन चालक परवाना

3) पॅन कार्ड

4) पारपत्र

5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र

6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र

7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र

8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र

9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र

संपादन : स्वप्नील पवार                                     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here