ब्रेकिंग : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या महिला नेता रेखा जरे यांचा खून; ‘अशी’ झाली घटना

अहमदनगर :

जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून झाला असल्याची माहिती मिळाली आहे. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. यातच त्या मृत्यूमुखी पडल्याची माहिती समजत आहे.

सामाजिक आणि महिलांसाठी सातत्याने कार्यरत असणार्‍या जरे यांच्या खुणामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर झालेल्या हल्लात त्या गंभीर जखमी झाल्या. तशाच अवस्थेत त्यांना रुग्णालयात हलविले जात असतानाच रस्त्यातच त्यांना मृत्युला सामोरे जावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरे स्वतः कार चालवत नगरकडे येत होत्या. रस्त्यात एका दुचाकीला कट लागल्यवरून वाद झाला. वाद सुरू असताना दुचाकीस्वाराने जरे यांच्यावर धारदार शस्रने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here