अशी बनवा स्वादिष्ट आणि चवदार ‘चिकन बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

बिर्याणी म्हटलं की सर्वांचीचं आवडती… मग ती व्हेज असो अथवा नॉन व्हेज. ही बिर्याणी बनवायला थोडा वेळ लागतो पण खाताना मात्र बोटं चाटत राहाल, इतकी चवदार आणि चमचमीत, झणझणीत आहे. नेहमी बिर्याणीचे तेच ते प्रकार करून कंटाळा आला असेल तर हा बिर्याणी प्रकार नक्कीच ट्राय करून बघा.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 500 ग्राम बोनलेस चिकन
 2. 500 ग्राम बासमती तांदूळ
 3. 400 ग्राम दही
 4. 4 टेबलस्पून साजूक तूप
 5. 2 टीस्पून आले लसूण पेस्ट
 6. 2 दालचिनी तुकडे
 7. 5 मसाला वेलची
 8. 6 ते 7 हिरवी वेलची
 9. 5 लवंग
 10. 3 जायवती
 11. 3 टेबलस्पून शाही बिर्याणी मसाला
 12. 1/2 टीस्पून हळद
 13. 1 टीस्पून लाल तिखट
 14. चवीनुसार मीठ
 15. 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 16. 3 तमालपत्र
 17. 1/4 किलो उभा चिरलेला कांदा
 18. 1 बारीक चिरलेला टोमॅटो
 19. 1/4 टीस्पून हिरवा रंग
 20. 1/4 टीस्पून केशरी रंग
 21. 2 टेबलस्पून तळलेले काजू तुकडॆ

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. चिकन स्वच्छ धुवून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्या. तांदूळ पाण्यात भिजवत ठेवा.
 2. सर्वात प्रथम चिकन मॅरीनेट करा. चिकनमध्ये दही, आले लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, 1टेबलस्पून शाही बिर्याणी मसाला, मीठ, कोथिंबीर हे सर्व साहित्य घालून एकजीव करा. फ्रीजमध्ये 1तास ठेऊन द्या.
 3. गॅसवर एका भांड्यात तूप गरम करून त्यात 2 तमालपत्र, 1 दालचिनी तुकडा, 2 जायवंती, 3  लवंग, 4 हिरवी वेलची, 3 मसाला वेलची फोडणीत घाला. चिरलेल्या कांद्यातला अर्धा कांदा फोडणीत घाला.कांदा सोनेरी झाल्यावर टोमॅटो शिजवून घ्या.
 4. टोमॅटो शिजल्यावर मॅरीनेट केलेले चिकन घालून शिजत ठेवा. चिकनमध्ये 2 टेबलस्पून शाही बिर्याणी मसाला व चवीनुसार मीठ घाला.
 5. एका बाजूला गॅसवर पाणी उकळवत ठेवा. त्यामध्ये तांदूळ घाला. उरलेले खडे मसाले घाला.1 टेबलस्पून तूप घाला.भात छान मोकळा होतो.
 6. खडा मसाल्याचा भाताला मस्त सुवास येतो. भाताला 50%शिजवून घ्या. मोठ्या गाळणीवर भात टाकून भातातले पूर्ण पाणी काढून घ्या.एका बाजूला कांदा कुरकुरीत तळून घ्या.
 7. चिकन शिजत आले की एका जाड बुडाच्या भांड्याला थोडे तूप घालून शिजवलेल्या भाताचा थर लावा. मग चिकन ग्रेव्हीचा थर लावा.असे करत आलटून पालटून पूर्ण थर लावून वरती तळलेला काजू, कांदा पसरवून थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवा.
 8. मध्यम आचेवर पाच मिनिटं ठेवा. गरम चिकन ग्रेव्ही मध्ये भात मस्त फुलून येतो.
 9. बिर्याणी गॅसवरून उतरवून गरमगरम रायत्या सोबत खायला तय्यार आहे….

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here