पदवीधर निवडणूक : महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत व्हायरल झाला ‘तो’ संदेश; जयंत पाटीलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

अहमदनगर :

राजकारण म्हटलं की नावात, नंबरमध्ये गफलत तसेच अफवा पसरवण्याचे कारस्थान विरोधी पक्षांकडून नेहमीच होत असते. आता पदवीधर निवडणूक राज्यभरत गाजत आहे. अशातच राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवाराबाबत एक संदेश व्हायरल झाला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण (अण्णा) लाड यांचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक 16 आहे, असा गोंधळ वाढवणारा संदेश व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अरुण गणपती लाड यांचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक १ आहे. यावरून गोंधळ उडाल्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी ‘महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण (अण्णा) लाड यांचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक १६ असल्याचा मुद्दाम दिशाभूल करणारा संदेश पदवीधर उमेदवारांना मोबाईलवर पाठवला जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण गणपती लाड यांचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक १ आहे. अनुक्रमांक १ समोरच पदवीधर मतदारांनी आपले ‘१’ असे मत द्यावे. कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या संदेशांना बळी पडू नये’, असे आवाहन केले आहे.

दरम्यान मंत्री जयंत पाटील यांनीही ‘कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या संदेशांना बळी पडू नये. महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण गणपती लाड यांचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक १ आहे. अनुक्रमांक १ समोरच पदवीधर मतदारांनी आपले ‘१’ असे मत द्यावे’, असे आवाहन केले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here