विराटने तोडले सचिनचे आणखी एक रेकॉर्ड; वाचा, कोणता केलाय विक्रम

मुंबई :

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड तोडण्यात कर्णधार विराट कोहली यशस्वी झाला आहे. कौतुकाची बाब म्हणजे हे रेकॉर्ड तोडताना ईतरही रेकॉर्ड आपोआप तोडले गेले आहेत. कोहलीने सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यात अनेक रेकॉर्ड तयार झाले आहेत.    

कर्णधार विराट कोहलीने याच मैदानावर अनेक विक्रम केले. त्यातील एक नोंद जलद 22 हजार आंतरराष्ट्रीय धावा होती. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. हा आकडा गाठण्यासाठी विराट कोहलीने 462 डाव खेळला असताना सचिन 493 डावांमध्ये येथे पोहोचला होता. विराटने 418 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे सचिनने आपल्या 418 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21 हजारांचा टप्पा ओलांडला होता.

इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी वनडे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. कर्णधार म्हणून कोहलीने 91 व्या सामन्यात अझरला (5243) मागे टाकले. कोहलीने यापूर्वी 90 सामन्यांच्या 86 डावांमध्ये 5168 धावा केल्या होत्या. तो अझरपेक्षा 75 धावा मागे होता.

कर्णधार म्हणून कोहलीची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 21 शतके ठोकली आहेत. या सामन्यात कोहलीने 89 धावांचा डाव खेळला. त्याने 87 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा नववा आणि तसा 250 वा सामना होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here