खळखळून हसवणारे हे खतरनाक जोक्स नक्कीच वाचा; हसून हसून पोट दुखल्यास तुमची जबाबदारी

1) गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..

तू परीक्षेला नाही बसू शकत…..

गण्या: फिकीर नाॅट गुरूजी…

आपल्याला जराबी घमेंड नाय …

आपून उब्यानेच पेपर लिवू बगा…

गुरूजींनी शाळा सोडली….

2) पेपर मधे प्रश्न होता……शास्त्रिय कारणे द्या……

डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये……..

एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले…….

‘ कारण कोण झोपलय ते कळत नाही ‘ .

मास्तरांनी बदाबदा बडवला..

3) गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून …… !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

4) आई :- “चिंटु लवकर

आंघोळ करून घे,

नाहीतर शाळा बुडेल..!”

चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?

आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

5) गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं ………

बाई– पाल हि कोण होती ?

गण्या– पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली…….

बाईंनी शाळा सोडली

6) भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.

सर – बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?

बंडू – सर, भावा-बहिणीचा.

सर – काय ?

बंडू – हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले.

7) गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी- एखादी मुलगी ‘दळण’ घेऊन जाताना ‘वळून’ पाहते त्याला “दळणवळण” म्हणतात…

.

.

गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..

8) मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का

मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. “.” ????

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली ??

वडापाव चा गाडा चालवतायत.

9) गुरुजी :- गण्या, “मी तुला कानफटीत मारली” ह्याचा भविष्यकाळ सांग बघू….?

गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!!

10)

शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर…??

मक्या:-पेरु

शिक्षक:-शाब्बाश

मक्या:-आंबा

शिक्षक:-गुड

मक्या:-सफरचंद

शिक्षक:-वेरी गुड३ झाले आता अजून १२सांग…

मक्या:- “एक डझन केळं”….!!!.

मक्या जोमात मास्टर कोमात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here