मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात पंजाब शेतकरी आंदोलन आणि केंद्राच्या यंत्रणा या विषयावर भाष्य करत भाजपवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-
सैन्य कारवाईस मजबुती मिळणार आहे. हे सर्व आपण वर्षभरापासून ऐकत आहोत, पण घुसलेले सैन्य बलप्रयोग करून हटवल्याच्या शौर्याची बातमी काही देशवासीयांना अद्यापपर्यंत ऐकायला मिळालेली नाही. श्रीनगर, कश्मीर खोऱयात जवानांची बलिदाने सुरूच आहेत. गेल्या महिनाभरात महाराष्ट्राचे 11 सुपुत्र देशासाठी वीरगतीला प्राप्त झाले. हा मजकूर लिहीत असताना छत्तीसगढ येथील नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे जवान नितीन भालेराव यांना वीरगती प्राप्त झाली. दोन दिवसांपूर्वी 21 वर्षांचे यश देशमुख श्रीनगरात अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले.
कोल्हापूरचे संग्राम पाटील पाकडय़ांबरोबरच्या चकमकीत शहीद झाले. कोल्हापूरचेच ऋषीकेश जोंधळे व नागपूरचे भूषण सतई पाकड्यांना उत्तर देताना वीरगतीस प्राप्त झाले. देशासाठी बलिदान देणे, त्याग करणे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची परंपराच आहे, पण राज्यकर्ते असे किती बळी व बलिदाने देणार आहेत? महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही? लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे.
तेव्हा या यंत्रणांना चीन आणि पाकिस्तानचीही सुपारी द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कदाचित चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील. बहुधा लडाखमध्ये घुसलेले चिनीही शरण येतील व पाकडेही ‘पीओके’ सोडून पसार होतील. विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा एकंदर विद्यमान राज्यकर्त्यांचा समज दिसत आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही.
संपादन : स्वप्नील पवार
- NCB ची केली धडक कारवाई; दाऊदला मोठा धक्का, वाचा कुणाला ठोकल्यात बेड्या
- आजपासून सुरू झाला ‘हा’ जबरदस्त सेल; सर्व उत्पादनांवर मिळतोय 80% पर्यंत डिस्काउंट, अगदी 99 रुपयांपासून मिळताहेत वस्तु
- आठवडाभर IPO मार्केटमध्ये राहणार ‘बहार’; एका पाठोपाठ एक ‘या’ 3 कंपन्या देत आहेत मालामाल होण्याची संधी
- द्राक्ष उत्पादकांवर मोदींची कुऱ्हाड; पहा अनुदान बंदीचा काय होणार दुष्परिणाम
- PMAY-G: 6 लाख लोकांच्या खात्यात पंतप्रधान मोदींनी पाठवले 2691 कोटी; ‘असे’ मिळवा स्वस्त घर