आटपाडी जनावरांच्या बाजारात आला मोदी बकरा; किंमत वाचून हैराण व्हाल…!

आटपाडी :

आता जनावरांचे बाजार आधीसारखे भरू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक जनावरांचा बाजार प्रसिद्धा असतो. तसाच सांगलीत आटपाडीतील जनावरांचा बाजार भलताच प्रसिद्ध आहे. आता या बाजराचं नाव सध्या चर्चेत आहे ते मोदी बकर्‍यामुळे. या बाजारात तशा तर कित्येक मेंढ्या, जनावरे विक्रीसाठी येतात मात्र या मोदी बकर्‍याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विशेष बाब म्हणजे बाजारात या बकर्‍याला तब्बल 70 लाखाची मागणी आली मात्र मालकाने बकरा विकण्यास नकार दिला. कारण या बकर्‍यासाठी मालकाला दीड कोटी रुपये अपेक्षित आहेत. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखाची बोली लावली गेली तरीही या बकर्‍याची विक्री झाली नाही.

आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या जनावरांच्या बाजारात  सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी आपल्या मोदी बकर्‍यासह दाखल झाले. 70 लाखांपर्यंत या बकऱ्याला मागणी झाली. मात्र मेटकरी यांनी दीड कोटी शिवाय बकरा विक्री करणारा नसल्याचा निर्णय घेतल्याने हा दीड कोटींचा बकरा विकू शकला नाही.

याच बाजारात आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीला 13 लाख रुपये इतकी मागणी झाली. ही मेंढी प्रसिद्ध मोदी बकऱ्याचे पिल्लू आहे. त्यांनी ती दोन लाखाला खरेदी केली होती. सोमनाथ जाधव यांच्या अन्य तीन मेंढ्या तब्बल नऊ लाख रुपयांना शेतकऱ्यांनी मागितले. तर मासाळवाडी येथील शिवाजी तळे यांच्या सात महिन्याच्या मेंढीला चार लाख रुपयांची मागणी आली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here