फळभाज्यांपाठोपाठ पालेभाज्यांच्या दरावरही झाला असा परिणाम; वाचा, काय आहेत ताजे दर

पुणे :

बाजारात सध्या फळांचे आणि फळभाज्यांचे दर कमी होताना दिसत आहेत. आता यापाठोपाठ पालेभाज्यांचे दरही स्वस्त होऊ लागले आहेत. किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांना 5 ते 12 रुपये प्रती जुडी मोजावे लागत आहेत. असे असले तरी कांद्याच्या पातीला मात्र चांगला भाव मिळत आहे. कांदापातच्या जुडीला 5 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची आवक वाढली आहे. आज पावणेदोन लाख जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्याच्या दीड लाख जुडी होती.तर मेथीची आवक मात्र घटली आहे. आज 80 हजार जुडींची आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दीड लाख जुडी होती.

घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी भाज्यांना अपेक्षित दर मिळत नाहीये. त्यामुळे सर्वच प्रकारच्या पालेभज्यांचे भाव घाऊक बाजारात घसरले आहेत.

असे आहेत पालेभाज्यांचे ताजे दर (शेकडा जुडी) :-

कोथिंबीर : 100-600, मेथी : 200-500, शेपू : 100-300, कांदापात : 100-1500, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-400, अंबाडी : 500-600, मुळे : 800-1000, राजगिरा : 300-400, चुका : 200-500, चवळई : 200-300, पालक : 400- 500.

दरम्यान फळांच्या दरात घसरण झाली असून बाजारात मागणीही कमी झाली आहे. बोरांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी, कलिंगडांच्या भावात किलोमागे 3 ते 8 रुपये तर सीताफळाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. थंडीस सुरवात झाली असून करोनाचा प्रादुुर्भाव अद्याप कायम आहे. थंड फळे खाल्लयानंतर सर्दी होईल या भीतीने फळांना मागणी कमी झाल्याचे निरीक्षण व्यापारी वर्गाकडून नोंदविण्यात आले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here