पुणे :
थंडीच्या दिवसात काही थंड आणि रसदार असणार्या फळांची मागणी हळूहळू कमी होऊ लागते परिणामी बाजारात फळांचे दरही कमी होऊ लागतात. दरम्यान आता वातावरणात थंडी वाढू लागल्याने मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळ तसेच बोरांच्या दरात बदल झाला आहे. या फळांच्या दरात घसरण झाली असून बाजारात मागणीही कमी झाली आहे.
बोरांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी, कलिंगडांच्या भावात किलोमागे 3 ते 8 रुपये तर सीताफळाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. थंडीस सुरवात झाली असून करोनाचा प्रादुुर्भाव अद्याप कायम आहे. थंड फळे खाल्लयानंतर सर्दी होईल या भीतीने फळांना मागणी कमी झाल्याचे निरीक्षण व्यापारी वर्गाकडून नोंदविण्यात आले. असे असले तरी बाजारात उर्वरित फळांची मागणी आणि पुरवठा यात तफावत नसल्याने चांगला दर मिळत आहे. पपईला किलोमागे दोन रुपयांची दरवाढ मिळाली आहे.
असे आहेत फळांचे ताजे दर :-
लिंबे (प्रति गोणी) : 70-130, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 220-480, (4 डझन ) : 80-180, संत्रा : (10 किलो) : 100-400, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-30, आरक्ता 20-60. कलिंगड : 8-14, खरबूज : 15-25, पपई : 5-12, चिकू : 100-500, पेरू : 100-300, बोरे (10 किलो) चमेली : 50-90, उमराण : 30-35, चेकनट : 300-350, चण्यामण्या 400-450.
संपादन : स्वप्नील पवार
- NCB ची केली धडक कारवाई; दाऊदला मोठा धक्का, वाचा कुणाला ठोकल्यात बेड्या
- आजपासून सुरू झाला ‘हा’ जबरदस्त सेल; सर्व उत्पादनांवर मिळतोय 80% पर्यंत डिस्काउंट, अगदी 99 रुपयांपासून मिळताहेत वस्तु
- आठवडाभर IPO मार्केटमध्ये राहणार ‘बहार’; एका पाठोपाठ एक ‘या’ 3 कंपन्या देत आहेत मालामाल होण्याची संधी
- द्राक्ष उत्पादकांवर मोदींची कुऱ्हाड; पहा अनुदान बंदीचा काय होणार दुष्परिणाम
- PMAY-G: 6 लाख लोकांच्या खात्यात पंतप्रधान मोदींनी पाठवले 2691 कोटी; ‘असे’ मिळवा स्वस्त घर