म्हणून आता सीरमनेही केला 100 कोटींचा मानहानीचा दावा; वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात

पुणे :

नुकतीच 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटल भेट देऊन लस बनवण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला होता. या भेटीच्या दुसऱ्याचं दिवशी हैदराबाद येथील एका रुग्णाने ‘कोविशील्ड’ लस घेतल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम झाल्याचा दावा केला आहे. त्यापोटी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई त्याने मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

सीरम संस्थेकडून सांगण्यात आले आहे की, रुग्णाला आमची सहानुभूती आहे. कोव्हिशिल्ड लशीची चाचणी आणि त्याची सध्या बिघडलेली प्रकृती याचा काहीही संबंध नाही. त्याच्या या प्रकृतीला विनाकारण तो सीरम संस्थेला दोषी धरत असून असे चुकीचे आणि गंभीर आरोप करणाऱ्या या व्यक्तीवर कंपनीकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा कऱण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण :-

सध्या लसीचा प्रयोग करण्यासाठी अनेक स्वयंसेवक निवडले जात आहेत. सिरमच्या लसीची सध्या चेन्नईमधील काही स्वयंसेवकावर चाचणी केला जात आहे. दरम्यान एका  40 वर्षीय व्यक्तीनं लशीचे डोस घेतल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी आपल्या शरीरावर झालेले दुष्परिणाम नोंदवले. त्याला या लशीचा डोस घेतल्यानंतर व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन (neurological breakdown) सारख्या समस्यांचा जाणवल्या. याची भरपाई नुकसान भरपाई म्हणून सीरम संस्थेनं 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.    

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here