सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : 10वी पास असणार्‍यांनी करा अर्ज, वेतन आहे 50 हजारांपेक्षा जास्त

मुंबई :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने एक मोठी सुवर्णसंधी आणली आहे.

भारतीय तटरक्षक दलाने नेव्हीगेटरच्या बर्‍याच पदांवर नोकरीची संधी आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांवर निवडलेल्या तरुणांना सुरुवातीच्या पातळी -3 नुसार 21,700 रुपये मूलभूत वेतन मिळेल. याशिवाय डीए व इतर भत्तेही देण्यात येतील. तर मुख्य पदाच्या पदोन्नतीनंतर मूलभूत वेतन पातळी -8 दरमहा 47,600 रुपये होईल. डीए स्वतंत्रपणे प्राप्त होईल.

अशा आहेत पात्रता अटी :-

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. एससी, एसटी आणि क्रीडा कोटा अंतर्गत तरुणांना 5 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे.

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 22 वर्षे असावे. एससी आणि एसटी प्रवर्गात जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये 5 वर्षे आणि ओबीसींसाठी 3 वर्षांची सवलत मिळेल.

अर्जविषयी महत्वाचे :-   

भारतीय तटरक्षक दलाला दिलेल्या अधिसूचनेच्या शेवटी क्यूआर कोड देण्यात आला आहे. आपल्या स्मार्टफोनमधून हा क्यूआर कोड स्कॅन करून आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आज (30 नोव्हेंबर 2020) अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपण 7 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here