मुंबई :
सध्या विविध बँका आपले वेगवेगळे आर्थिक आणि वेळेसंबंधीचे नियम बदलताना दिसत आहेत. आता अशातच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंगशी संबंधित एक अत्यंत महत्वाचा निर्णय 2 दिवसांनंतर बदलनार आहे. पुढच्या महिन्यापासून रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा 24 तास आणि सात दिवस उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ग्राहक RTGS द्वारे वर्षाच्या 365 दिवसांतून कधीही पैशांचा व्यवहार करू शकतील.
मिळालेल्या महितीनुसार मागील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच RTGS सुविधा दिवसाचे 24 तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ठरवल्याप्रमाणे 1 डिसेंबर पासून हा निर्णय लागू होईल.
ही सुविधा सुरू झाल्यावर भारत जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक होईल ज्यांच्याकडे 24x7x365 मोठ्या मूल्याची रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. आता महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी आरटीजीएस सिस्टम सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध असेल, अशी माहिती आरबीआयकडून मिळाली आहे.
ग्राहकांना एटीएममधून (ATM) पैसे काढणं आणखी सोपं व्हावं, यासाठी आरबीआयकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून यासंबंधी काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात. अधिक माहितीनुसार बँका 1 डिसेंबरपासून ओटीपी (One Time Password) च्या आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरावी लागणार आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- ‘त्या’ गावात माजी आमदार आणि पत्नीचे पॅनल होते एकमेकांविरुद्ध; ‘असा’ लागला ऐतिहासिक निकाल
- पुछता है भारत, क्या बोलेगी सरकार : मग समजेल अर्णब-सरकार संबंधातला दुवा नेमका कोण?
- जगातील ‘हे’ 3 महाराजे होते भलतेच प्रसिध्द; ‘विचित्र’ गोष्टींसाठी खर्च करायचे पाण्यासारखा पैसा
- म्हणून सुरू झाले भावनांचे ‘तांडव’; UP पोलिसांची टीम मुंबईत दाखल
- कोट्यावधी रुपयांचे मालक असलेले ‘हे’ 5 क्रिकेटर्स आहेत फक्त 10 वी किंवा 12 वी पास; इतर नावे वाचून व्हाल शॉक