रामदास आठवलेंची कोरोनावरील ही नवी कविता होतेय व्हायरल; कोरोना को मत डरोना, नियम पाळा, कोरोनाला जाळा

मुंबई :

‘कोरोना गो, गो कोरोना’ या यशस्वी नार्‍यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोरोनावरील नवी कोरी करकरीत कविता व्हायरल होताना दिसत आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही कविता ऐकवली आहे.

‘मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना’चा नारा दिला. कोरोना वाढतोय, त्यावर मी कविता केलीय. पण कोरोनाने मलाही सोडलं नाही. मलाही कोरोना झाला. त्यामुळे मी नवी कविता करतोय, ‘गो कोरोना गो, कोरोना गो.. नो कोरोना नो कोरोना नो.., कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा’, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान यावेळीही आठवले यांनी ‘सरकार आगामी काळात पडेल का, हे आता तरी सांगता येणार नाही. पण येत्या काळात वादामुळे हे सरकार पडेल असं वाटतं’, असे म्हणत आपले मत मांडले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘नेहरु सेंटरमधील बैठकीत शरद पवार यांचा विधानसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळावं, असा आग्रह होता. पण शेवटी कॉम्प्रमाईज करावं लागलं. त्यावेळी भाजप नेते अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही चर्चा सुरु होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता बनत नसेल तर भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता स्थापन करु, अशी चर्चा होती.

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here