पेट्रोल-डिझेलच्या दरात झाला बदल; वाचा, काय आहेत नवे दर

मुंबई :

वाढत्या पेट्रोल आणि डीझेल दरामुळे तुमच्या खिशावरील भार वाढलेला असताना अजून एक मोठी बातमी आली आहे. तुमच्या खिशावर अजून भार घेण्यासाठी तयार राहा कारण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहेत.

या महिन्यात आठव्यांदा इंधनांच्या किंमतीत वाढ झाली असून देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव पुन्हा एकदा ८२ रुपये प्रति लीटरच्या पलीकडे गेला आहे आणि डिझेल ७२ रुपये प्रति लीटरपेक्षाही जास्त झाले आहे.

मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 89 रुपयांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जगभरात कोविडच्या घटनांमध्ये वाढ असूनही कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. तेल उत्पादक देशांच्या संघटना ओपेकने कच्च्या तेलाचे उत्पादन आणखी तीन महिन्यात वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत हा संमिश्र कल दिसून येतो आहे.

तेल विक्री कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलची किंमत दिल्लीत २४ पैसे, कोलकातामध्ये २३ पैसे तर चेन्नईमध्ये २१ पैसे प्रति लीटर या दराने वाढवली. तर डिझेलची किंमतही दिल्ली आणि कोलकात्यात २७ पैसे आणि चेन्नईत २६ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय वायदा बाजार इंटर काँटिनेंटल एक्सचेंजवर (आयसीई) ब्रेंट क्रूडचे फेब्रुवारी डिलिव्हरी वायदा प्रमाणात शुक्रवारी मागच्या सत्राच्या तुलनेत १.०३ टक्के तेजीने ४८.२८ डॉलर प्रति बॅरल अशा भावावर बंद झाला. २ नोव्हेंबर रोजी क्रूडचा भाव ३५.७४ डॉलर प्रति बॅरलवर होता ज्यानंतर गुरुवारी ब्रेंटचा भाव ४९.०९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वर गेला. न्यूयॉर्क मर्कंटाईल एक्सचेंजमध्ये (एनएमएक्स) वेस्ट टेक्सस इंटरमीडिएटचे जानेवारी डिलिव्हरी वायदा प्रमाण शुक्रवारी गेल्या सत्राच्या तुलनेत ०.३९%च्या घटीने ४५.५३ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. दोन नोव्हेंबर रोजी डब्ल्यूटीआयचा भाव ३३.६४ डॉलर प्रति बॅरलवर तुटला होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here