स्मिथने रचला ‘हा’ विक्रम; मिळवलं सचिनच्या पंक्तीत स्थान

सिडनी :

क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरच्या विक्रमांच्या यादीत आपणही असावं, अशी अनेक नवख्या-जुन्या क्रिकेटप्रेमींची इच्छा असते. पूर्ण मात्र कष्ट आणि संधी मिळणार्‍यांची होते. सध्या चालू असलेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथने शतक केल आहे. परंतु तो फक्त शतकच करून थांबला नाही तर त्याने एक जबरदस्त विक्रमही केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये खेळवण्यात आलेल्या वनडे सामन्यांत सलग तीन शतके ठोकणारा स्टीव स्मिथ केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथने हा विक्रम केला.

विशेष बाब म्हणजे अशा प्रकारचा विक्रम याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने १९९८ मध्ये ही कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामन्यांत अनुक्रमे १४३, १३४ आणि १४१ धावा फटकाविल्या होत्या. स्मिथने रविवारच्या सामन्यांत ६४ चेंडूत १०४ धावांची खेळी करत मास्टर ब्लास्टरसह संयुक्तपणे या पंक्तीत स्थान मिळविले. ह्यापूर्वी भारताविरुद्ध खेळलेल्या मागील दोन वनडे सामन्यात त्याने अनुक्रमे १३१ आणि १०५ धावांच्या खेळी उभारल्या होत्या.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here