दिल्ली :
जेसीबी इंडिया लिमिटेडने भारतातील इंडस्ट्रीत प्रथमच ड्युअल इंधन लोडर सादर केला आहे. आता डिझेल आणि सीएनजी या दोन्हीमधून जेसीबी चालनार आहे. या मॉडेलचे नाव जेसीबी 3 डी एक्स डीएफआय आहे. हे मशीन एचसीसीआय (एकसंध चार्ज कॉम्प्रेशन इग्निशन) तंत्रज्ञान वापरते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे दुहेरी इंधन लोडर लॉन्च केले.
JCB 3DX DFi लोडर भारतात विकसित केले गेले आहे आणि लाँच करण्यापूर्वी वेगवेगळ्या ऑपरेटिंग परिस्थितीत त्याची चाचणी केली गेली आहे. बल्लभगढमधील कंपनीच्या कारखान्यात त्याचे उत्पादन होईल. JCB 3DX DFi सीएनजी आणि डिझेलच्या मिश्रणावर चालते. यामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल. या व्यतिरिक्त, सीएनजी आर्थिकदृष्ट्या परवडनारे आहे तसेच ऑपरेटिंग खर्चही कमी होण्यास मदत करते.
यावेळी जेसीबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी म्हणाले की, “आमच्या चार दशकांच्या कामकाजात आम्ही अभिनव गुंतवणूकी सुरू ठेवली आहे. हे आमच्या प्रमुख ऑपरेशन्सपैकी एक आहे. हे ड्युअल इंधन मशीन डिझेलऐवजी सीएनजीवर चालते आणि आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा भागविण्यासाठी हे विकसित केले गेले आहे. आता ते जगभरातील निरनिराळ्या देशात निर्यात केले जाईल. “
जेसीबी इंडियाचे देशात पाच कारखाने आणि एक डिझाईन सेंटर आहे. गुजरातमधील वडोदरा येथे सध्या सहावा जेसीबी ग्रुप कारखाना बांधला जात आहे. कंपनीने भारतात बनवलेल्या मशीन्सची 110 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केली आहे. जेसीबीच्या वन ग्लोबल क्वालिटी स्टँडर्डनुसार डिझाइन आणि तयार केले गेले आहेत. जेसीबीकडे 60 डीलर्स आणि 700 आउटलेट आहेत.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस