उदयनराजेंनी दिले ‘ते’ आश्वासन; देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंना…

मुंबई :

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा, मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांना मी भाग पाडतो. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करा आम्ही प्रश्न एका दिवसात सोडवतो, असे आश्वासन भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.

यावेळी ते सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्याच वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवलं, त्यांना नाव ठेवली जातात. आता सत्तेत आहात ना मराठा आरक्षणाला पुढे न्या. सत्तेत राहायचंय ना, महाराष्ट्र आहे, मराठा समाज निर्णायक जात आहे. जातीतला कोणताही उमेदवार असू देत, त्याच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला लावणार, असं आश्वासन घ्या.

यावेळी उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा विषय काहींना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. पण किती दिवस मराठ्यांचे कैवारी, मराठा स्ट्राँग मॅन उपमा किती दिवस द्यायची?, असा प्रश्न उपस्थित करत उदयनराजेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here