उदयनराजेंचा शरद पवारांवर वार; ‘तो’ सवाल केला उपस्थित

मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरून सध्या अनेक राजकीय वादविवाद सुरू आहेत. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 

अजून किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार?, असा सवाल उपस्थित करत भोसले म्हणाले की, वर्षानुवर्षे मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे सत्तेत असलेले या प्रश्नाला जबाबदार आहेत. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांनी आता समाजाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही?, असाही सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी पवारांना नाव न घेता लक्ष्य केले. मराठा आरक्षणाचा विषय काहींना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. पण किती दिवस मराठ्यांचे कैवारी, मराठा स्ट्राँग मॅन उपमा किती दिवस द्यायची?, असा प्रश्न उपस्थित करत उदयनराजेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here