पैशाचे नियोजन करताना ‘या’ भन्नाट युक्त्या ठेवा लक्षात; नक्कीच वाचा

आयुष्यात पैसा कुणाला नको असतो. सगळ्यानाच तो हवाहवासा वाटतो. पण तो साचवण्यासाठी किंवा कमावण्यासाठी आपण विशेष काही विचार करत नाहीत. म्हणूनच आज काही आयडिया आम्ही सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची खात्री आहे.

  1. आपण उत्साहाच्या भरात कधी कधी अनावश्यक गोष्टींचीही खरेदी करतो. गरजा ओळखून खरेदी करा.
  2. जर तुमच्याकडे योग्य नियोजन असेल तर थोड्या उत्पन्नातही मोठी गुंतवणूक होऊ शकते. अर्थात त्याचा फायदाही होतोच.
  3. आपली नोकरी/व्यवसाय याशिवाय जिथे तुमची उपस्थिती आवश्यक नसेल असा एखादा जोडव्यवसाय करा. किंवा जिथे घरातील पत्नी किंवा रिटायर्ड व्यक्ती वेळ देऊ शकते असाही व्यवसाय करू शकता.
  4.  शेअर बाजारात तेजी-मंदीची चक्रे येतात. तुमच्या आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून वास्तविक परताव्याची अपेक्षा ठेवा. 
  5.  शेअर्स, म्युच्युअल फंड्स, पोस्ट, सोने अशा निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा. सातत्याने निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा.
  6. जे लवकर बचतीला सुरुवात करतात त्यांना पुढे आयुष्यात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यताही कमीच असते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here