भारताने पसरवला करोना विषाणू; पहा चीनने कशाच्या आधारावर केलाय हा आरोप

जगभराला करोना विषाणू आणि त्यामुळे होणाऱ्या कोविड 19 आजाराच्या विळख्यात चीन देशाने अडकवले आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी यावर वेळोवेळी माहिती दिलेली आहे. त्याच चीनने आता या विषाणूच्या फैलावास थेट भारताला जबाबदार ठरवण्याचा बेजबाबदार प्रयत्न सुरू केला आहे.

चीनी अकादमी ऑफ साइंसेज यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, 2019 च्या उन्हाळ्यात करोनाचा विषाणू भारतात प्रथम दिसला होता. त्यावेळी जनावरांच्या शरीरातून तो भारतीय माणसांच्या शरीरात प्रवेश करून वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. चीनच्या वूहान भागात सापडलेला विषाणू हा मूळ विषाणू नव्हता. भारतातून तो विषाणू अनेक बदल होऊन तिकडे आलेला आहे.

यापूर्वीही चीनने या विषाणूबाबत इटलीकडे बोट दाखवले होते. आता त्यांनी आपल्या जबाबदारीचे ओझे जगातील इतर देशांना टाकण्यासाठी असे दावे सुरू केले आहेत. जगाला माहिती आहे की, हा विषाणू चीनमधून सगळीकडे पसरला आहे. तरीही यावर आता वेगळ्या पद्धतीचे राजकारण करून पोळी भाजण्याची तयारी चीनने सुरू केली आहे.

भारतासह बांग्‍लादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्‍ट्रेलिया, इटली, चेक रिपब्लिक, रशिया आणि सर्बिया यापैकी एका कोणत्याही ठिकाणाहून हा विषाणू चीनमध्ये आल्याचा दावा येथील संशोधक करीत आहेत. एकूणच यामुळे पुन्हा एकदा चीन विरोधात जगातील इतर देश असा राजकीय सामना सुरू होणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here