टॉप 10 पैकी ‘या’ 5 कंपन्यांची m-cap 91,699 कोटींनी घसरली; रिलायन्सला झाले ‘एवढे’ मोठे नुकसान

मुंबई :

सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे मार्केट कैपिटलाइजेशन(m-cap) मागील आठवड्यात एकूण 91699 कोटी रुपयांनी घसरले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वात मोठा फटका बसला आहे. याशिवाय इन्फोसिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलच्या m-cap मध्येही घसरण झाली आहे, तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सचे बाजार भांडवल वाढले.

गेल्या आठवड्यात RILचे बाजार भांडवल 60,829.21 कोटी रुपयांनी घसरून 12,23,416.97 कोटी रुपयांवर गेले. त्याचप्रमाणे एचडीएफसीची बाजारपेठ 13,703.75 कोटी रुपयांनी घसरून 4,05,996.11 कोटीवर, भारती एअरटेल 11,020.23 कोटी रुपयांनी घसरून 2,52,755.97 कोटी, आयसीआयसीआय बँक 5,090.54 कोटी रुपयांनी घसरून रू. 3,26,225.04 कोटी रुपयांवर आली. इन्फोसिसचा m-cap 1,055.27 कोटी रुपयांनी घसरून 4,68,779.17 कोटी रुपयांवर आला.

इतर 5 कंपन्यांचा किती फायदा :-

दुसरीकडे एचडीएफसी बँकेची बाजारपेठ मागील आठवड्यात 20,482.86 कोटी रुपयांनी वाढून 7,93,336.55 कोटी रुपये, बजाज फायनान्स 11,181.01 कोटी रुपयांनी वाढून 2,95,466.65 कोटी रुपये, टीसीएस 7,335.91 कोटी रुपयांनी वाढून 10,05,320.15 कोटी, हिंदुस्तान युनिलिव्हर 4,135.22 रुपयांनी वाढून 5,02,147.16 कोटी रुपये झाली आणि कोटक महिंद्रा बँकेचा एमकेॅप 2,538.64 कोटी रुपयांनी वाढून 3,76,485.84 कोटी रुपयांवर गेला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here