Airtel च्या ग्राहकांना फ्री मिळतोय बंपर डेटा; मिळवण्यासाठी करावी लागेल ‘ही’ छोटी गोष्ट

दिल्ली :

भारती एअरटेलने ‘न्यू 4 जी सिम किंवा 4 जी अपग्रेड फ्री डेटा कूपन’ नावाची नवीन ऑफर बाजारात आणली आहे. या ऑफरअंतर्गत एअरटेलच्या ग्राहकांना 5 जीबी विनामूल्य डेटा देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेल थँक्स एप(app) पहिल्यांदा डाउनलोड करण्यासाठी एअरटेलच्या नवीन वापरकर्त्यांना 1 जीबीच्या 5 कूपनच्या स्वरूपात 5 जीबी डेटा मिळेल.

एअरटेल आपल्या ग्राहकांना 5 जीबी डेटा विनामूल्य देत आहे. ज्यांनी नवीन 4 जी सिम खरेदी केली आहे किंवा 4 जी डिव्हाइसवर अपग्रेड केली आहे, अशांना डेटा फुकट मिळवण्याची मोठी संधी आहे. प्रथमच मोबाइल नंबरचा वापर करून एअरटेल थँक्स अॅपसाठी नोंदणी केली. 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत 4 वर्षात प्रथमच भारती एअरटेलने रिलायन्स जिओपेक्षा 4 जी ग्राहक आपल्याशी जोडले आहेत.

ही ऑफर मिळविण्यासाठी एअरटेलच्या 4 जी ग्राहकांना एअरटेल थँक्स अॅप हे गुगल प्ले स्टोअर किंवा Apple अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाउनलोड केल्यावर वापरकर्त्याने आपला प्रीपेड मोबाईल नंबर वापरुन मोबाइल नंबर सक्रिय केल्याच्या 30 दिवसांच्या आत नोंदणी करावी लागेल. एअरटेलने म्हटले आहे की, प्रत्येक वापरकर्त्याच्या खात्यात 1 जीबीच्या पाच कूपन नंतर 72 तासांत जमा होतील.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here