‘त्या’ निवडणूकीला भारताने केला होता विरोध; पाकिस्तानचा झाला बल्ल्या, इमरान खान पडले तोंडावर

इस्लामाबाद :

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांत येथे जबरदस्तीने निवडणुका घेण्याच्या पंतप्रधान इम्रान खानच्या निर्णयाचा त्यांना फटका बसल्याचे दिसत आहे. त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ आणि त्याच्या मित्रपक्ष मजलिस-ए-वहादत-ए-मुस्लिमीन यांनी सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आहे. एवढे करूनही  24 सदस्यांच्या विधानसभेत त्यांच्या पार्टीला केवळ 10 जागा मिळू शकल्या. मात्र, इम्रानचा पक्ष 6 अपक्ष खरेदी करून सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. हे सर्व अपक्ष यापूर्वी पीटीआयचे सदस्य होते.

त्याचबरोबर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) गिलगित-बाल्टिस्तानचे प्रवक्ते शहजाद इल्हमी यांनी असा आरोप केला आहे की इम्रान सरकारने केवळ हा प्रदेश देशातील पाचवे राज्य बनवण्याचे आश्वासन दिले होते.देशाच्या संसदेत इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत नाही. अशा परिस्थितीत घटनात्मक सुधारणांना मान्यता मिळू शकत नाही. इम्रान खान यांचे हे आश्वासन केवळ निवडणुकीचे धाडस होते असा आरोप त्यांनी केला.

एकूणच काय तर देशाचे पंतप्रधान असणार्‍या व्यक्तीला स्वत: प्रचार करूनही तोंडावर पडावे लागले आहे. 2 पक्ष एकत्र असूनही अवघ्या 10 जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. 2009 मध्ये गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच असे घडले आहे की इस्लामाबादमधील सत्तेत असलेल्या पक्षाला या भागातील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत निकालानुसार इम्रान खानच्या पीटीआयने 10 जागा, अपक्षांना 6 आणि पीपीपीला एक जागा मिळाली. दरम्यान विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की, सरकारने या मतदानात हस्तक्षेप करत जास्त जागा लाटण्याचा प्रयत्न केला आहे.  

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाला भारताने विरोध दर्शविला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सप्टेंबरमध्ये एका डिजिटल पत्रकार परिषदेत सांगितले की, “सैन्याने व्यापलेल्या तथाकथित गिलगिट-बाल्टिस्तानमधील परिस्थिती बदलण्यासाठी पाकिस्तानने घेतलेल्या कोणत्याही कारवाईला कायदेशीर आधार नाही आणि हे अवैध आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here