आमदारांना चोळीबांगडी, ‘त्यांच्या’ घरावर मोर्चा; मराठा मोर्चाचा सरकारला ‘त्या’ तारखेपर्यंत अल्टिमेटम

मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाला कोर्टात मिळालेल्या स्थगितीनंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. अशातच ‘मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावा अन्यथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल’, असा गंभीर इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. 

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. दरम्यान पुढे बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतींनिधींना कडक शब्दात इशारा दिला. त्यांनी म्हटले की, येत्या 2 डिसेंबरपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास शरद पवारांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढण्यात येईल. तसेच सर्व पक्षीय आमदारांना चोळीबांगड्या भेट देण्यात येईल. त्यामुळे येत्या 2 तारखेनंतर राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाविषयी भाष्य करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिलं पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. कधी नव्हता. मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here