सोन्याच्या किमतीत झाले असे बदल; वाचा, काय आहेत आजचे भाव

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या भावात बदल झालेला दिसून येत आहे. आज 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरून 48,660 रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,660 रुपयांवरून 47,650 रुपयांवर आली आहे. 

सोने सकाळच्या घटीनंतर उसळी घेऊन वर आला. कोविड-19 च्या व्हॅक्सीनच्या संदर्भात झालेली प्रगती आणि जो बाइडन याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाचा पदभार सांभाळण्याची तयारीत प्रोत्साहन पॅकेजची आशा वाढल्याने सोन्याच्या किंमतीत बदल होताना दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम अनुक्रमे 51,820 रुपये तर प्रति 10 ग्रॅम अनुक्रमे 48,650 रुपये आहेत. तर या दोन शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 47,510 रुपये आणि प्रति 10 ग्रॅम 47,650 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर अनुक्रमे 45,900 रुपये आणि 50,060 रुपये आहेत.

कोरोना लसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 49,810 रुपयांवर पोहोचली आहे तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 52,010 रुपयांवर पोहोचले आहेत. बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,460 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 49,590 रुपये आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here