दिल्ली :
यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की जिओने आयटेलबरोबर (iTel ) पार्टनरशिप केली आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता आणि जिओ एकत्र येऊन देशात 3 हजार ते 4 हजार रुपयांदरम्यान स्मार्टफोन बाजारात आणणार आहेत. हे हँडसेट अद्याप भारतीय बाजारात बाजारात दाखल झालेले नाहीत. जिओ सध्या जियोफोन सिरिजसाठी फ्लेक्सबरोबरही काम करत आहे आणि आता गुगलची भागीदारीत कमी किमतीच 4 जी स्मार्टफोन जिओ बाजारात आणणार आहे.
रिलायन्स जिओ आपले 4 जी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी स्मार्टफोनमध्ये स्थानांतरित करण्याची तयारी करत आहे. या व्यतिरिक्त, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांचे 2 जी वापरकर्त्यांकडेही जिओला आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दूरसंचार कंपनी लवकरच देशातील स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोच्या भागीदारीत जिओ एक्सक्लुझिव्ह स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. आपल्या स्मार्टफोनबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्म फ्री एक्सेस, डिस्काउंट, वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, शॉपिंग बेनिफिट्स यासारख्या ऑफरदेखील देईल.
या अहवालात असेही म्हटले आहे की रिलायन्स जिओ कार्बन, लावा आणि काही चिनी ब्रँडसारख्या स्थानिक उत्पादकांशीही चर्चा करीत आहे. अहवालात या प्रकरणाशी संबंधित लोकांची माहिती देताना ईटीने सांगितले आहे की 8,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन आणण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. विश्लेषकांच्या मते जिओ सध्या करत असलेल्या काही घोषणांमुळे कंपनीला एकूण ग्राहक वाढविण्यात मदत होईल. देशात 350 दशलक्षहून अधिक फीचर फोन वापरकर्ते आहेत आणि ही संख्या प्रचंड आहे. म्हणूनच कमी किंमतीचे स्मार्टफोन लॉन्च करून जिओकडे ग्राहक वाढवण्याची मोठी संधी आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट