महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी आघाडीचे सरकार स्थापन केल्याच्या घटनेला आता वर्ष पूर्ण झालेले आहे. दरम्यानच्या काळात आणि आताही सरकार उड्या-परवा पडणार अशीच हवा विरोधीपक्ष असलेल्या भाजपने केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीम त्यासाठी कार्यतत्परतेने कामाला लागलेली आहे. मात्र, त्यांना यश मिळत नसल्याने युवा काँग्रेस नेते व अहमदनगरचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजपला आव्हान दिले आहे.
त्यांनी प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, विरोधकांनी हे सरकार अकरा दिवसात कोसळेल, तीन महिन्यात कोसळेल अशा वल्गना केल्या. परंतु एक वर्ष पूर्ण झालं तर देखील विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही. एकूणच टीम फडणवीस यांच्या काटशह देण्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे सरकार अजिबात डगमगले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
त्यांनी म्हटलेले आहे की, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल मी सरकारचे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मनापासून अभिनंदन करतो. कोरोना सारख्या महामारीच जागतिक संकट राज्यावरती आलेले असताना देखील या संकटावर उत्तम प्रशासकीय नियोजनाच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने जनतेच्या सहभागातून जवळपास मात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याच्यावर काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते यांच्या बरोबर उत्तम समन्वय ठेवत हे सरकार राज्यात काम करीत आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस