Pradhan Mantri Awas Yojana : अवघ्या 3.50 लाखात मिळणार घरे; या राज्यात बुकिंग सुरु, ‘असा’ करा अर्ज

दिल्ली :

पंतप्रधान आवास योजनेचे उद्दीष्ट म्हणजे शहरी किंवा ग्रामीण भागातील घरे देशातील गरजू नागरिकांना पुरविणे. या योजनेअंतर्गत सीएलएसएस किंवा क्रेडिट लिंक्ड सबसिडी पहिल्यांदा गृह खरेदीदारांना दिली जाते. म्हणजेच घर खरेदीसाठी गृह कर्जावर व्याज अनुदान दिले जाते. केंद्र सरकारने पीएम आवास योजनेंतर्गत क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीम 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. याचा फायदा 2.50 लाखांहून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल. 25 जून रोजी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.

उत्तर प्रदेश हाऊसिंग डेव्हलपमेंट कौन्सिलने 1 सप्टेंबरपासून राज्यातील 19 शहरांमध्ये 3516 प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचे बुकिंग सुरू केले आहे.गरिबांना हे घर फक्त 3.50 लाखात मिळेल. त्याअंतर्गत एकूण 3516 घरे बुक केली जातील. लखनौमध्ये जास्तीत जास्त 816 घरांचे बुकिंग सुरू झाले आहे. या योजनेत घर खरेदी करण्यास इच्छुक लोक ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या बुकिंग अंतर्गत केवळ अशी घरे देण्यात येणार आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. राज्यातील गरीब लोकांना केवळ 3.50 लाख रुपयांत घरे मिळतील. त्यांना ही रक्कम 3 वर्षात परत करावी लागेल. यापूर्वी यूपी हाऊसिंग डिक्लरेशन कौन्सिलने ५ वर्षाच्या हप्त्यावर घर देण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु तो कमी करून ३ वर्षे करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत, गरीब लोकांसाठी घराचे कारपेट क्षेत्र 22.77 चौरस मीटर आणि सुपर क्षेत्र 34.07 चौरस मीटर असेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here