‘Google Pay’च्या भारतातील युझर्संसाठी गुड न्यूज; मनी ट्रान्सफर सेवेबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई :

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल-पे चे युझर्स यापुढे कोणालाही पैसे फ्रीमध्ये ट्रान्सफर करू शकणार नाहीत, म्हणजेच त्यांना त्यासाठी चार्ज भरावा लागेल. गुगल-पे जानेवारी 2021 पासून पीअर टू पीअर पेमेंट सुविधा बंद करणार आहे. त्याऐवजी कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम जोडली जाईल. यानंतर, युझर्सना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फी द्यावी लागेल, अशा आशयाच्या बातम्या गेल्या २ दिवसांपासून तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील.  पण या बातमीवर स्पष्टीकरण देताना गुगलने म्हटले आहे की, भारतातील गूगल पेच्या ग्राहकांना कोणतेही शुल्क पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावे लागणार नाही आहे. फक्त अमेरिकेतील गुगल पेच्या ग्राहकांसाठी हा शुल्काबाबतचा नियम असणार आहे.

दरम्यान WEB APP बंद करण्याची घोषणा गुगलकडून नोटीस जारी करत करण्यात आली असून परिणामी 2021 च्या सुरुवातीपासून युजर्स Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. युजर्सना याकरिता गुगल पेचा वापर करावा लागेल. 

गुगलच्या या निर्णयामुळे आता त्यांच्या गुगल पेच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवस सुविधा मोफत वापरू द्यायची आणि नंतर सवय लागल्यावर त्यासाठी चार्ज करायचे, ही जुनी पद्धत गुगलपे ने अवलंबिली, अशी टीका ग्राहक करत होते.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here