महिंद्राची ‘ही’ गाडी आहे सर्वात सुरक्षित ऑफ रोडर; Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळालेत 4 स्टार

मुंबई :

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली.

आता अशातच नवीन 2020 महिंद्रा थार लॉन्च होण्यापूर्वीच बर्‍यापैकी लोकप्रिय झाली होती आणि लॉन्चिंगनंतरही तीची लोकप्रियता वाढतच आहे. आता पुन्हा एकदा सेफ्टीबाबत ही गाडी चर्चेत आली आहे. सर्व न्यू महिंद्रा थारने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टारचे रेटिंग प्राप्त केले आहे. यास प्रौढ सुरक्षा आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये 4-4 स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. या रेटिंगसह, 2020 महिंद्रा थार ही भारतातील सर्वात सुरक्षित ऑफ-रोडर बनली आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये नवीन महिंद्रा थार लाँच केली गेली. त्याची एक्स-शोरूम किंमत 9.80 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ईएसपी, इंटिरियर रोल केज, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, मागील पार्किंग असिस्ट, मुलांच्या सुरक्षेसाठी आयएसओएफआयएक्स, ईबीडी असणारा एबीएस, ब्रेक असिस्ट, वाहन ओव्हर स्पीड इशारा, स्पीड सेन्सिंग फ्रंट डोअर लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, मागील प्रवाश्यांसाठी 3 पॉईंट सीट बेल्टचा समावेश आहे.

देशातील टॉप 3 सुरक्षित कार :-

  • १) Mahindra XUV300 ही एक दमदार गाडी आहे. 5 स्टार रेटिंग प्राप्त असलेली ही गाडी पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हीटेड ओआरव्हीएम, ISOFIX चाईल्ड सीट अँकर, एअरबॅग्ज, ईबीडी, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट पार्किंग सेन्सर, फ्रंट आणि रीअर फॉग लाईट असे सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत.
  • २) Tata Altroz या गाडीलाही ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंगही मिळाली आहे. यात ड्युअल एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ईबीडी असलेले एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आहेत आहेत. 
  • ३) Tata Nexon या गाडीला डुअल फ्रंट एयरबैग्स, एबीएस, ईबीडी, ईएसपी, ट्रैक्शन कंट्रोल, हिल-होल्ड असिस्ट असे अनेक फीचर्स दिलेले आहेत. तटाच्या या दुसऱ्या कारला ‘सुरक्षित कार’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here