आगबाबो.. एका माशीला मारणे पडले त्यांना पडले ‘एवढे’ महागात; वाचा हा चित्तथरारक किस्सा

आपल्या घरातील माशा किंवा डास मारण्यासाठी विविध उपाय करत असतो. कुणी कॉईल लावत तर कुणी लिक्विड वापरत. या दोन्ही गोष्टी असतानाही बहुतांश ठिकाणी डास मारण्याचे रॅकेटही वापरले जाते.

यामुळे मच्छर/ माशी मरतही असतील परंतु माशी  मारताना केलेल्या चुकीमुळे अख्ख्या घराला भुर्दंड सोसावा लागू शकतो, याची कुणी कल्पना तरी केली आहे का? चक्क माशी मारताना झालेल्या चुकीमुळे स्वतःच्या आरोग्यास नुकसान तर झालेच मात्र घराचेही बरेच मोठे नुकसान झाले. फक्त एका माशी मारण्यामुळे….

तर मंडळी झालं असं की, फ्रांसच्या दोर्दोन शहरात एक ८० वर्षीय व्यक्तीबाबत हा किस्सा घडला. सदर व्यक्ती आपल्या डायनिंग टेबलवर निवांत जेवण करत बसले होते. एक माशी सारखी त्यांच्या जेवनापाशी घोंगावत होती. या म्हाताऱ्या व्यक्तीने तिला फडके मारून हाकलायचा प्रयत्न केला मात्र ती माशी पुन्हा येऊन त्यांच्या ताटापाशी घोंघावू लागली. आता मात्र या वृद्धाचा संताप झाला. मच्छर मारण्याचे ज्या इलेक्ट्रोनिक रॅकेट घेऊन त्यांनी माशीला मारण्याचा प्रयत्न केला. पण रॅकेटला जसे त्या व्यक्तीने सुरु केले, सुरु करताच त्याच्या घरात स्पोट झाला. कारण त्या व्यक्तीच्या घरात तेव्हा गॅस लिक झाला होता आणि त्यामुळे त्याच्या किचनचे छत उडाले होते. घराचा थोडसा भाग जळाला होता.

धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्तीच्या हाताला सुद्धा मोठ्या प्रमाणत इजा झाली. फ्रान्सच्या काही लोकल न्यूज वाहिनीने जेव्हा या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा त्या व्यक्तीच्या घराची बऱ्यापैकी दुर्दशा झालेली होती. तेथील लोकांचे म्हणणे होते कि, हि वयोवृद्ध व्यक्ती खूप नशीबवान होती जी या स्पोटातून वाचली. त्या व्यक्तीला आता हॉस्पिटल मध्ये भर्ती केलेलं आहे.

मंडळीहो… आपल्या घरातील गॅसचे काम झाल्या नंतर बंद करा, कारण अशा घटनांना व्हायला वेळ लागत नाही. घरातील गॅस व इलेक्ट्रिक उपकरणे सुद्धा आपल्यासाठी घातक ठरू शकतात, म्हणून आपल्या घरातील या वस्तूंना काम झाल्यावर व्यवस्थित बंद करायला विसरू नये.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here