२६/११ : आणि तिथे कसाब नाक घासून बोलला ‘भारत माता की जय’; वाचा बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतः सांगितलेली ही गोष्ट

आज बरोबर 12 वर्षांपूर्वी पाकिस्तानवरून आलेल्या आतंकवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार केला. अचानक केलेल्या या हल्लाबोलमुळे सगळीकडे गोंधळ उडाला. 26/11 ला झालेला तो भयंकर हल्ला, मृत्युमुखी पडलेले निष्पाप लोक अवघ्या देशाने बघितले. आजही 26/11 हल्ल्याच्या आठवणी भारतीयांच्या डोळ्यात आसवं आणतात. त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आठवणी देशाच्या मनात अजूनही ताज्या आहेत. तब्बल ३ दिवस चाललेल्या या रक्तरंजित खेळात दहशतवाद्यांनी खूप मोठा नरसंहार घडवून आणला होता. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठार झाले होते, तर अजमल कसाब हा एकमेव जिवंत दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. अखेर त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

दरम्यान तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’  या पुस्तकात कसाब आणि 26/11  हल्ल्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.

या पुस्तकात त्यांनी मांडलेले मुद्दे :-

माझा राग अनावर झाला होता. काही दिवसांपूर्वी या राक्षसाने (कसाब) माझ्या सहकाऱ्यांना आणि निरपराध नागरिकांना ठार मारले होते. काय माहित नाही माझ्या मनात काय आलं की मी गाड्यांचा काफिला थांबवला आणि गाडीतून बाहेर पडलो. कसाबला बाहेर काढण्यासाठी मी त्याला (सोबत असलेले सुरक्षा कर्मचारी) सांगितले.

पहाटे साडेचार वाजले असतील. हिवाळ्याची थंडी होती आणि मंदिरे व मशीदींचे दरवाजेसुद्धा उघडे नव्हते. मी कसाबला आज्ञा दिली – गुडघ्यावर बसून कपाळ जमिनीवर ठेव. त्याने नेमके हेच केले. मग कसाब उभा राहिला तेव्हा मी त्याला एक आदेश दिला आणि म्हणालो- भारत माता की जय बोल… त्याने ते ही केले. पण मी समाधानी नव्हतो आणि मी त्याला पुन्हा भारत माता की जय बोलण्याचा आदेश दिला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here