प्रताप सरनाईकांना मोठा झटका; ‘त्या’ जवळच्या व्यक्तीला सुनावली तीन दिवसाची कोठडी, ‘असा’ होऊ शकतो परिणाम

मुंबई :

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे पथकाने चौकशी केली. प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला असून तपास सुरु आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. दरम्यान सरनाईक यांचे व्यवसायिक भागीदार  अमित चांदोळे यांना 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे चांदोळे तीन दिवस ईडीच्या ताब्यात राहणार असून त्यांची ईडीकडून कसून चौकशी केली जाणार आहे.

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार चांदोळे यांना सुनावलेली न्यायालयीन कोठडी हा सरनाईक यांच्यासाठी धक्का आहे. आता ईडी चांदोळे यांची चौकशी करणार असून या या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पार्श्वभूमीवर ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया आमदार सरनाईक यांनी दिली आहे.

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आज सकाळी ईडीने चांदोळे यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान सरनाईकपुत्र विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here