मास्तर आणि पोरांचे हे अतरंगी जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

१) शिक्षिका: मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे.
नारायण, तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?

नाऱ्या: श्रीमतीराम!
शिक्षिका: गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री.
लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?

नाऱ्या: पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे! 

२) गुरूजी : आफ्रीकेत आढळणाऱ्या तीन प्राण्याची नावे सांगा?

गण्या : वाघ….
गुरुजी : अजून दोन प्राणी?
.
.
.
.
.
.
.
गण्या : वाघाचे आई आणी वाघाचे बाबा!!!

३) गुरुजी – काय रे वर्गात डुलक्या देतोयस?

विद्यार्थी – नाही गुरुजी ….
.
.
.
.
.
.
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!
गुरुजी पृथ्वी सोडून गेले…

४) गुरुजी: गण्या… देश कधी स्वतंत्र झाला?

गण्या: लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर

५) “शब्दाने शब्द वाढतात म्हणून

आम्ही तोंडी
परिक्षेमध्ये शांत बसायचो…!!” 

६) हद्द झाली राव..

. आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे..
Feeling Love
Heart Broken

. . आम्ही जेव्हा शिकत होतो.
तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय..

.
.
स्वप्नात पन गणिताच मास्तर
हाणताना दिसायच

७) टीचर: लिहा दुनिया गोल आहे.

स्टूडंट : तुम्ही सांगता म्हणून लिहितोय
नाहीतर दुनिया “लय हरामखोर ” आहे

८) विज्ञानाचा तास सुरू असतो.

मास्तर : सांग बर बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रु का असते?

बंड्या: कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो.

मास्तर शाळा सोडून अफगानीस्तानला गेले.

९) गुरुजी = गण्या, 52 गावांची नावे सांग

गण्या = चाळीस गाव ,आणि बारामती

गुरुंजी राजिनामा देऊन वनवासाला निघुन गेले

१०) गुरूजी: सांगा बरे बंडू ….

कडधान्य म्हणजे काय?

बंडू: गुरूजी, शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते.
त्यास कडधान्य असे म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here