भारताच्या डिजिटल स्ट्राईकवरून चीनचा जळफळाट; चीनने केला ‘हा’ गंभीर आरोप

दिल्ली :

भारत सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केला. केंद्र सरकारने देशाची सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या अशा ४३ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली. भारतातील सुरक्षा, संरक्षण आणि सांप्रदायिकतेला धोका निर्माण करणाऱ्या अॅप्सला भारता बंदी घालत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. आधी केंद्र सरकारने दोनशेहून अधिक चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. यात टिकटॉक सारख्या प्रसिद्ध अॅपचा समावेश होता. केंद्र सरकारने केलेल्या या डिजिटल स्ट्राईकमुळे चीनचा जळफळाट झाला आहे.

चीनने या अॅपबंदीचा जाहीररित्या विरोध केला असून या निर्णयामुळे जागतिक व्यापारी संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचा भंग होत असल्याचा गंभीर आरोपही चीनने केला आहे. ‘भारताने जूननंतर चौथ्यांदा राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन चीनच्या अॅपवर बंदी घातली आहे. बाजारपेठेची तत्त्वे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा हा भंग असून, चिनी कंपनीचे हितसंबंध आणि वैध अधिकारांवर यामुळे गदा येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करीत असताना, आंतरराष्ट्रीय नियम, स्थानिक कायदे व नियमांचे पालन करण्याची सूचना आम्ही कायमच चिनी कंपन्यांना करत असतो’, असे म्हणत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी भारताविषयी आणि डिजिटल स्ट्राईकविषयी भाष्य केले.

बंदी घातलेली संपूर्ण यादी  :-

१) AliSuppliers Mobile App
२) Alibaba Workbench
३) AliExpress – Smarter Shopping, Better Living
४) Alipay Cashier
५) Lalamove India – ७) Delivery App
६) Drive with Lalamove India
७) Snack Video
८) CamCard – Business Card Reader
९) CamCard – BCR (Western)
१०) Soul- Follow the soul to find you
११) Chinese Social – Free Online Dating Video App & Chat
१२) Date in Asia – Dating & Chat For Asian Singles
१३) WeDate-Dating App
१४) Free dating app-Singol, start your date!
१५) Adore App
१६) TrulyChinese – Chinese Dating App
१७) TrulyAsian – Asian Dating App
१८) ChinaLove: dating app for Chinese singles
१९) DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online
२०) AsianDate: find Asian singles
२१) FlirtWish: chat with singles
२२) Guys Only Dating: Gay Chat
२३) Tubit: Live Streams
२४) WeWorkChina
२५) First Love Live- super hot live beauties live online
२६) Rela – Lesbian Social Network
२७) Cashier Wallet
२८) MangoTV
२९) MGTV-HunanTV official TV APP
३०) WeTV – TV version
३१) WeTV – Cdrama, Kdrama&More
३२) WeTV Lite
३३) Lucky Live-Live Video Streaming App
३४) Taobao Live
३५) DingTalk
३६) Identity V
३७) Isoland 2: Ashes of Time
३८) BoxStar (Early Access)
३९) Heroes Evolved
४०) Happy Fish
४१) Jellipop Match-Decorate your dream island!
४२) Munchkin Match: magic home building
४३) Conquista Online II

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here