म्हणून अजित पवारांनी केला लॉकडाऊनला विरोध; सांगितले ‘हे’ कारण

मुंबई :

देशासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेदिंवस लोकांचे गांभीर्य कमी होताना दिसत आहे परिणामी रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. अशातच काही निर्णयक्षम नेत्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनला थेट विरोध केला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको, असे म्हणत आपला विरोध दर्शवला आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची गेल्या नऊ महिन्यापासून अवस्था फारच बिकट झाली आहे.त्यांचे घर रोज काम केले तर चालते. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका अशाच लोकांना बसतो. तरीही ज्या ज्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले तेव्हा निमूटपणे हा सर्व समाज आदेश पाळत आल्याचे सांगत कोरोना वाढू नये याची काळजी घेऊया.

दरम्यान अजितदादा हे उपमुख्यमंत्री पदावरच समाधानी असल्याचे त्यांनी एका खोचक प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची पूजा होत असते, आषाढीची पूजा तुम्ही कधी करणार? असा प्रश्न विचारला असता पांडुरंगाने जे दिले आहे त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे,असे उत्तर अजित दादांनी दिले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here