अशी बनवा ‘स्पेशल चिकन बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

बिर्याणी म्हटलं की सर्वांचीचं आवडती… मग ती व्हेज असो अथवा नॉन व्हेज. ही बिर्याणी बनवायला थोडा वेळ लागतो पण खाताना मात्र बोटं चाटत राहाल, इतकी चवदार आणि चमचमीत, झणझणीत आहे. नेहमी बिर्याणीचे तेच ते प्रकार करून कंटाळा आला असेल तर हा बिर्याणी प्रकार नक्कीच ट्राय करून बघा.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 1/2 किलो चिकन
 2. 400 ग्राम तांदूळ
 3. 2-3 मोठे कांदे
 4. 4-5 कडीपत्ता पान
 5. 4 टेबलस्पून आलंलसून कोथींबर पेस्ट
 6. 1 टेबलस्पून बिरयाणी मसाला
 7. 1 टेबलस्पून गरम मसाला
 8. 1 टेबलस्पून लाल तिखट
 9. 1 लिंबूरस
 10. 2 हिरव्या मिर्च्या
 11. 1 टीस्पून हळद
 12. 2 तेजपत्ता पान
 13. 2 इंच दालचिनी
 14. 1 टीस्पून शहा जिरं
 15. 5 काळे मिरी
 16. 4 लवंग
 17. 2 छोटी इलायची
 18. 1 मोठी मसाला इलाची
 19. मीठ चवीनुसार
 20. 100 /150 ग्राम तेल

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…

 1. प्रथम मसाल्याची तयारी करून घ्या. तांदूळ धुऊन ठेवा. चिकन धुऊन घ्या. एका पातेल्यात चिकन, कांदा, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, हळद घाला.
 2. मीठ आणि पाणी घालून 5 मिनिट उकळून घेतले. दुसऱ्या पातेल्यात तेल गरम करून त्यात सर्व खडे मसाले घातले.
 3. नंतर कांदा, कडीपत्ता, मिर्ची घालून 1 मिनिट परतून झाले की आलं-लसून कोथिंबीर पेस्ट घालून पुन्हा तेही परतून घ्या आणि सर्व पावडर मसाले घाला आणि धुऊन ठेवलेले तांदूळ घाला.
 4. तांदूळ चांगले मसाल्यात मिक्स करून लिंबू रस घालून, उकळून घेतलेले चिकन पाण्यासकट घाला मीठ घालून ढवळून घ्या.
 5. मोठा गॅस वर उकळी काढून घ्या आणि गॅस मिडीयम केला पाणी आटत आले की झाकण ठेवले गॅस मंद केला.
 6. 5 मिनिटांनी झाकण काढून वरून थोडे तेल घाला, रंग घाला आणि पुन्हा झाकण ठेऊन द्या. 2 मिनिट आणि गॅस बंद करा. 5 मिनिट झाल्यावर झाकण काढून सर्व्ह करा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here