म्हणून सोन्या चांदीच्या दरात पुन्हा हलकीशी तेजी; वाचा, काय आहेत आजचे भाव

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच गेल्या आठवड्यापासून घसरत असणाऱ्या सोन्याच्या दरात आज थोडीशी तेजी आली आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सुधार आल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमती 45 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

सोने सकाळच्या घटीनंतर उसळी घेऊन वर आला. कोविड-19 च्या व्हॅक्सीनच्या संदर्भात झालेली प्रगती आणि जो बाइडन याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाचा पदभार सांभाळण्याची तयारीत प्रोत्साहन पॅकेजची आशा वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असल्याची माहिती एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी दिली.

एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 48,273 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. गेल्या सत्रात ही 48,228 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. दुसरीकडे चांदी 407 रुपयांच्या तेजीसह 59,380 रुपये प्रति किलो झाली होती. गेल्या सत्रात मंगळवारी ती 58,973 रुपये प्रति किलोवर बंद होती. वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींत घट झाली होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1,812 अमेरिकी डॉलर प्रति औंस आणि चांदी 23.34 डॉलर प्रति औंसवर सपाट राहिली.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here