बाबो… पाकिस्तान सरकारने घेतला मोठा निर्णय; बलात्काऱ्याला होणार ‘ती’ शिक्षा

कराची :

जगभरात जेव्हा जेव्हा बलात्काराचे मोठे प्रकरण घडते तेव्हा तेव्हा लोक अत्यंत कठोर शिक्षेची मागणी बलात्कार करणाऱ्या आरोपीसाठी करतात. ‘अमुक जातीच्या व्यक्तीने केला तमुक जातीच्या मुलीवर बलात्कार’ अशा पद्धतीच्या बातम्या देणारी मंडळी एकप्रकारे माध्यमांना मिळालेल्या स्वातंत्र्यावरच बलात्कार करत असतात. जग या पद्धतीने पुढे सरकत असताना पाकिस्तान सरकारने बलात्कारासबंधित निर्णयाचे सगळीकडे स्वागत केले जात आहे.

बालात्कार करणाऱ्या आरोपींसाठी पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पाकिस्तान सरकार नवीन कायदा आणणार असून त्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणातील दोषीला इंजेक्शन देऊन नपुंसक करण्याची शिक्षा या कायद्यात असणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत इम्रान खान यांनी या कायद्याला मंजुरी देण्यासाठी सहमती दर्शवल्याची माहिती मिळत आहे.

जगभरात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असताना पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयाबाबत समाजमाध्यमांवर समर्थन देणाऱ्या प्रतिक्रिया मिळत आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याचा मसुदा सादर करण्यात आला. बैठकीत या कायद्यावर चर्चा करण्यात आली. इम्रान खान यांनी या मसुद्याला मंजुरी दिली असल्याचं म्हटलं आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृतपणे यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान इम्रान खान यांनी अशा कायद्याची गरज असल्याचे नमूद केले होते, अशी माहिती पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तात सांगितली आहे.

राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला व बाल अत्याचार अधिनिमयाच्या संशोधनासंबंधित अध्यादेश जारी करू शकतात. कारण सध्या संसदेचं सत्र सुरू नाही. सध्याच्या कायद्यानुसार तेथे बलात्कार प्रकरणात अधिकतम शिक्षा जन्मठेप आहे. पीडितेचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूदंडाची परवानगी दिली जाते, अशी माहिती मंत्रिमंडळाचे प्रवक्ता खांडकर अनवारुल इस्लाम यांनी दिली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here