घरखरेदीसाठी पुन्हा सुवर्णसंधी; शून्य मुद्रांक शुल्क योजनेत झाली ‘या’ तारखेपर्यंत वाढ

मुंबई :

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी रियल इस्टेट सेक्टरमध्ये अनेक बदल करण्यात आले. विविध करांमध्ये सूट देण्यात आली तसेच अनेक योजनाही लागू करण्यात आल्या. तसेच बिल्डर्सनीही आपल्या घराच्या किमती कमी केल्या. अशातच राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क माफ केल्यामुळे घरांच्या खरेदीत प्रचंड वाढ झाली. हा एका निर्णय बांधकाम व्यावसायिकांना तसेच घर खरेदी करणाऱ्यांना उभारी देणारा ठरला.

आता घरखरेदीसाठी पुन्हा सुवर्णसंधी आलेली आहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडकोने महाराष्ट्रच्यावतीने शून्य मुद्रांक शुल्काची योजना आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1 हजाराहून अधिक नरेडको सदस्यांच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे.

नरेडकोने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा मोठा फटका रियल इस्टेट क्षेत्राला देखील बसला आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के कपात केली आहे . या निर्णयानंतर नरेडकोने 31 ऑक्टोबरपर्यंत शून्य मुद्रांक शुल्क योजना जाहीर केली होती . या योजनेला आता ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने घरखरेदीला चालना देण्यासाठी ही योजना आता 31 डिसेंबपर्यंत राबवण्याचा निर्णय नरेडकोने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुद्रांक शुल्क माफ केल्यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये मुंबईतील निवासी घरांच्या विक्रीत 300 टक्क्यांनी वाढ आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here