बापरे! दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास दुकानावर होणार ‘ही’ कारवाई

औरंगाबाद :

मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त होती. एका दिवशी हजारोंनी रुग्ण औरंगाबादमध्ये सापडत होते. आता महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. पुन्हा आधीचीच शहरे आपोआप टार्गेट होताना दिसत आहेत. अशातच ‘औरंगाबादमध्येही रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. शहरात जर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल’, अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांड्ये यांनी दिली.

पुढे त्यांनी पुन्हा एकदा नियम कडक केले असल्याचे सांगितले आहे. अशातच त्यांनी दुकानदारांसाठी एक कडक नियम आणला आहे. विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास त्या व्यापाऱ्याचं दुकान 15 दिवसांसाठी बंद करण्यात येईल, असा नियम लागू केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे 100 टक्के पालन करावं लागणार असल्याचं आवाहन केलंय.

बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीक गर्दी करत असल्याचं दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे. याचसोबत व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे पांड्ये यांनी सांगितले.

मंगल कार्यालयांमध्ये केवळ फक्त 50 नागरिकांना परवानगी दिलेली आहे. मात्र हा नियम पाळला जात नाहीये. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईला सामोर जावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here