खडसेंच्या ‘त्या’ गाजलेल्या विधानावरून फडणवीस झाले आक्रमक; दिले ‘ते’ आव्हान

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ‘तुम्ही भाजपविरोधात बंड पुकारलंत तर तुमच्या मागे ED ची वगैरे कारवाई लावतील’, असं जयंत पाटील म्हणाले होते. पण ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’, असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपला दिला होता. याच पार्श्वभूमीवर ‘तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू’ म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, इडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असेल. त्याशिवाय ते रेड टाकत नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक झाली असेल तर एजन्सी कारवाई करेल. आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार असाल तर खुशाल करा.

यावेळी ते पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठकीत बोलत होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here