पुणे :
सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढउतार होत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या निवर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे आसपासच्या राज्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. या चक्रीवादाळाचे परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहेत. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्ह्यांतील काही भागात येत्या आठवड्यात पाऊस तसेच काही ठिकाणी पावसाबरोबर गारा पडतील. तर नंदूरबार, धुळे, जळगाव व नाशिकच्या काही भागात पाऊस पडेल. दिवाळी संपून आता नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध आला तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात अद्यापही अपेक्षित थंडी पडलेली नाही. कारण हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, सातत्याने ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- NCB ची केली धडक कारवाई; दाऊदला मोठा धक्का, वाचा कुणाला ठोकल्यात बेड्या
- आजपासून सुरू झाला ‘हा’ जबरदस्त सेल; सर्व उत्पादनांवर मिळतोय 80% पर्यंत डिस्काउंट, अगदी 99 रुपयांपासून मिळताहेत वस्तु
- आठवडाभर IPO मार्केटमध्ये राहणार ‘बहार’; एका पाठोपाठ एक ‘या’ 3 कंपन्या देत आहेत मालामाल होण्याची संधी
- द्राक्ष उत्पादकांवर मोदींची कुऱ्हाड; पहा अनुदान बंदीचा काय होणार दुष्परिणाम
- PMAY-G: 6 लाख लोकांच्या खात्यात पंतप्रधान मोदींनी पाठवले 2691 कोटी; ‘असे’ मिळवा स्वस्त घर