मुंबई :
सध्या आर्थिक संकटाचा काळ सुरु आहे. लोक थोडे थोडे पैसे एकत्र करून का होईना, छोटी-मोठी गुंतवणूक करत आहेत. सध्या आर्थिक क्षेत्राचा अंदाज लावणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे नेमकं कुठे गुंतवणूक करावी जेणेकरून जास्त परतावा मिळेल, अशा पद्धतीची संधी लोक शोधत आहेत. आता अशातच पोस्टाची एक जबरदस्त फायदेशीर योजना समोर आली आहे.
पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना असे या योजनेचे नाव असून या योजनेअंतर्गत वार्षिक 330 रुपयाचा प्रीमियम द्यावा लागतो. याचा अर्थ असा की सामान्यांना दिवसाला एका रुपयापेक्षाही कमी रक्कम भरून 2 लाखाचा कव्हर मिळतो आहे. ही योजना एक टर्म इन्शूरन्स प्लॅन आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतील. गरिबांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला विमा कव्हर मिळावा हे यामागचे ध्येय आहे.
या पॉलिसीबाबत अधिक माहितीसाठी 1800 180 1111 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा योजनेशी संबंधित सर्व तपशील वाचण्यासाठी www.financialservices.gov.in या वेबसाइटवर सर्व माहिती मिळवू शकता.
दरम्यान पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे फॉर्म विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, बांगला, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ यांचा समावेश आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा – http://jansuraksha.gov.in/
संपादन : स्वप्नील पवार
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस