ईडीच्या कारवाईनंतर प्रताक सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया; पहा, ईडीने केलेल्या कारवाईचा पहिला VIDEO

मुंबई :

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला असून तपास सुरु आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया आमदार सरनाईक यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांच्या सोबतच शिवसेनेच्या आणखी एका दिग्गज नेत्याला ईडीने नोटीस बजावल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

दिल्लीहून आलेली ईडीची टीम ही कारवाई करत आहे. ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदारकी भूषवतात. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ईडीचे पथक ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या घरी पोहोचले होते. या पथकात 8 ते 9 अधिकारी आहे. त्याचबरोबर पुण्यातील सीआरपीएफचे पथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here