म्हणून आजही झाली इंधन दरात वाढ; वाचा, काय आहेत आजचे दर

दिल्ली :

कोरोनामुळे जगभरात आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शेअर मार्केट, सोने, इंधनांचे दर कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. एकूणच काय तर आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशातच सर्वसामान्यांना खिशाला झटका देणारी बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी देशातील चार प्रमुख शहरं दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोलच्या दरात पाच ते सहा पैशांची वाढ केली आहे, तर डिझेलच्या दरात १६ ते १७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या पाच दिवसांत पेट्रोलच्या दरात दिल्लीत प्रतिलिटर ४३ पैसे वाढ झाली आहे, तर डिझेल ९५ पैसे प्रतिलिटर महागलं आहे.

गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल डीझेलचे दर स्थिर होते. वातावरण पुन्हा नॉर्मल होईल, अशी चिन्हे दिसत होती. अशातच अनेक देशांनी लॉकडाउनचे संकेत दिल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची भिती अनेक देशांनी वर्तवली आहे. त्यामुळे उत्पादन कपात करण्यात येत आहे. पुरवठा मर्यादित राहिल्याने मागील आठवडाभर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनीवरील दबाव वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ४६ डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे ८१.५९ रुपये, ८३.१५ रुपये, ८८.२९ रुपये आणि ८४.६४ रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत. त्याचबरोबर या चार महानगरांमधील डिझेलचे दर अनुक्रमे ७१.४१ रुपये, ७४.९८ रुपये, ७७.९० रुपये आणि ७६.८८ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here