म्हणून सोने चांदी आजही झाले आणखी स्वस्त; वाचा काय आहेत दर

मुंबई :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच गेल्या आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. गेल्या 2 दिवसांत सोन्याचे दर 1200 रुपयांनी घसरले, तर चांदीचे दर कमी झाले. MCX वरील सोन्याचा वायदा आज 0.9 टक्क्यांनी घसरला, तर चांदी 550 रुपये म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून तो 59,980 रुपये प्रतिकिलोवर आली.

स्पॉट सोन्याचे भाव 0.6 टक्क्यांनी घसरून 1826.47 डॉलर प्रति औंस झाले. जुलैनंतर सोन्याची ही नीचांकी पातळी आहे. त्याचप्रमाणे चांदी 1.1 टक्क्यांनी घसरली आणि प्लॅटिनममध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ झाली.

जाणकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोरोनालसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी बाजारावर परिणाम होऊन किंमतही कमी झाली आहे. दरम्यान सोन्याच्या दरात आता सातत्याने घट होताना दिसत आहे. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here