डिफेक्टिव्ह भाजपच्या कृपेने राज्य दिवाळखोरीत; काँग्रेसने केला आकडेवारीसह आरोप

मुंबई :

गोवा राज्याची वित्तीय तूट देशात सर्वाधिक असून राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. डिफेक्टिव्ह भाजप सरकारच्या धोरणांमुळे समृद्ध राज्याला दिवाळखोरीचा झटका बसणार असल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. 

पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी म्हटले आहे की, भ्रष्ट व असंवेदनशील भाजप सरकारने नाकर्तेपणाने राज्याला दिवाळखोर केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अतिउत्साहाला आवर घालुन लोकांची दिशाभूल करणे थांबवावे .राज्याची तूट एकूण घरगुती उत्पादनाच्या तुलनेत सन २०२०-२१ वर्षासाठी ५.३ टक्के राहणार आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. देशातील इतर राज्यांची एकूण सरासरी वित्तीय  तूट २.८ टक्के असुन, प्राथमीक एकूण घरगुती उत्पादनाच्या तूट ३.३ टक्के आहे. इतर राज्ये व संघप्रदेशात सरासरी १.१ टक्के आहे. अशावेळी भाजपने राज्याला आणखी संकटात टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजप सरकारने कर्ज काढण्याचा सपाटाच लावला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कॅसिनोचे शुल्क माफ करण्याचा विचार करीत आहेत. सरकराने बेकायदेशीरपणे कर्ज काढुन एसईझेड प्रवर्तकांना व्याजाचे २५६ कोटी फेडले असा दावा चोडणकर यांनी केला आहे.

 संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here